शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (16:33 IST)

खडसेंनी आपला जवाब बदलला असा आरोप

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि जामीन घोटाळ्यात नाव आल्याने अडचणीत आलेले भाजपा नेते एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यांनी आपला जवाब म्हणजेच साक्ष बदलली असा आरोप त्यांच्यावर होत आहे. यामध्ये पुण्याजवळच्या भोसरीतील एमआयडीसी जमीनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे झोटिंग समितीसमोर हजर झाले होते . यावेळी खडसेंनी या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल माहितच नसल्याचा साक्ष  नोंदवल्याचा दावा एमआयडीसीच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळं खडसेंनी भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यात आपला जबाब बदलल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. आधी त्यांनी ही जमीन एमआयडीसीची नाही असं वक्तव्य केलं होत. पण त्यानंतर त्यांनी थेट घूमजाव करत आपल्याला माहितच नाही, असा जबाब नोंदवला असा दावा एमआयडीसीच्या वकिलांनी केला आहे.त्यामुळे  आता खडसे हे आय प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत की सरकारी पक्ष त्यांना वाचवत आहे की सरकार त्यांना पाठीशी घालत आहे हे पहावे लागणार आहे.