शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (11:33 IST)

कोल्हापूरला भूकंपाचा धक्का

कोल्हापूरः पश्चिम महाराष्ट्रात मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापुरात भूकंपाचा धक्का जाणवला. कोल्हापूर आणि परिसरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी 3.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. 
 
भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या कळे ते पूनाळ दरम्यानच्या शेतात होता. या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
 
भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीखाली तब्बल ३८ किलो मीटरवर होता. तसेच भूकंपाची तीव्रता अथवा धक्का सौम्य असल्याने यात कुठलीही हाणी झाली नाही. भुमापन केंद्र वारणा, तसेच कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाल्याचे समजते.