सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (10:21 IST)

राज्यात एका दिवसात विक्रमी 12 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं शस्त्र असलेल्या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे. शनिवारी (4 सप्टेंबर) राज्यात विक्रमी 12 लाखांपेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. 
 
शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत महाराष्ट्रात 12 लाख 6 हजार 327 नागरिकांना कोरोनाचं लसीकरण करण्यात आलं. एका दिवसात सर्वाधिक लसीकरणाचा हा विक्रम आहे. अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी याबाबात माहिती दिली आहे.
 
यापूर्वी महाराष्ट्रात 21 ऑगस्टला सर्वाधिक 11 लाख 4 हजार डोस देण्यात आले होते. लसीकरणाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र आघाडीवर आहे. लसीचे दोन्ही डोस देण्याच्या बाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
 
विशेष म्हणजे शनिवारी एका दिवसात मुंबईतही 1 लाख 3 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. मुंबई मनपा हद्दीतील पात्र असलेल्या नागरिकांपैकी 80 टक्के नागरिकांनी किमान लशीचा एक डोस घेतला असल्याचं, मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितलं.