संबंधित माहिती
- 'पंढरपूरसह देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बुद्ध विहारे, स्तूप'
- भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी संबंध नाही- असादुद्दिन ओवेसी
- राज्यातील आदर्श अंगणवाड्यांचा कायापालट लवकरच – मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
- ८० हजार कोटींचे गुंतवणूक करार, ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक
- राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित
शिवसेने नेते यशवंत जाधव यांना ईडी कडून समन्स
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरात छापेमारी केल्यावर २ कोटी रोख, लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. आता जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असून ईडीने जाधव यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीच्या प्रकरणात ईडी कडून फेमा कायद्या अंतर्गत समन्स पाठवले असून त्यांची चौकशी होणार आहे. यशवंत जाधव यांच्या मालमत्तेची आणखी एक माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांची संपत्ती 36 वरून 53 वर पोहोचली आहे. त्यात कैसर बिल्डिंगचाही समावेश आहे. या इमारतीतून 80 कोटींचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी खरेदी करण्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत आयकर विभागाने या ठिकाणी भेट देऊन पडताळणी केली आहे.
यामध्ये काही लोकांनी प्रतिज्ञापत्रही दिले आहे. काही ज्वेलर्सकडून 6 कोटी रुपयांचे दागिने खरेदी केल्याचे समजले आहे. ईडीने जाधव यांनी परदेशात केलेल्या गुंतवणुकीच्या प्रकरणात ईडी कडून फेमा कायद्याअंतर्गत समन्स पाठवले असून त्यांची चौकशी होणार आहे
