Festival Posters
✕

मध्यावधी निवडणूक तूर्त होईल असं वाटत नाही : एकनाथ खडसे

Updated: रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (09:44 IST)
 
एकनाथ खडसे म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मतांतरं आहेत. आता ही मतांतरे उघडपणे होत असून वाढायला लागले आहेत. या अंतर्गत विरोधामुळेच हे सरकार मोडेल. असं असलं तरी मध्यावधी निवडणूक तूर्त होतील असं मला वाटत नाही. त्यांनाही काही काळ द्यावा लागेल. मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रीय आहे.”
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं होतं. त्यांनी भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची तयारी करणार असल्याचं वक्तव्यं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचं मध्यावर्ती निवडणुकांवरील हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. भाजपमध्येच मध्यावधी निवडणुकांवरुन दोन वेगळी मतं असल्याचंही या निमित्ताने समोर येत आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी भाजपला संघटनात्मक कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.
 
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
 
“महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु करणार आहे”, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
दरम्यान, नवी मुंबईत नेरुळमध्ये सकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 16 फेब्रुवारीला जे. पी. नड्डा हे देखील अधिवेशनाला हजर राहणार आहेत. यावेळी जे. पी. नड्डा हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या राज्यव्यापी अधिवेशनात महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सहभागी होणार आहेत. अधिवेशनात 10 हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित असतील असा दावा भाजपने केला आहे.
 
भाजपचे चंद्रकांत पाटील हे या अधिवेशनात जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. तसेच, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

World Food Day 2026 : जागतिक अन्न दिन; पार्श्वभूमी आणि इतिहास

LIVE: मुंबई पोलिसांनी सीजेपीला आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली

नवजात बाळाचा मृत्यू; नवरात्रीदरम्यान स्पर्श करण्यास जन्मदात्या पालकांचा नकार, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

Asian Games 2026 पंतप्रधान मोदींनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांची भेट घेतली

मुंबई पोलिसांनी कॉकरोच जनता पक्षाला १७ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली

पुढील लेख
Show comments