बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बारामती , शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (14:07 IST)

...तर बायको मला हाकलून देईल

अजित पवार यांच्या व्यक्तव्याने कार्यकर्ते खळाळून हसले
उपमुख्यमं‍त्री अजित पवार हे त्यांच्या दिलखुलास भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. बारामतीच्या कार्यकर्ता मेळाव्यातही त्यांच्या याच दिलखुलास आणि खुमासदार भाषणाचा प्रत्यय आला. बारामतीतले लोक मुंबईला येतात. तेव्हा मी थोडा नाराज होतो. अद्याप देवगिरी बंगला मिळालेला नाही. ज्या घरात मी सध्या राहतो ते लहान पडते. तिथे बसायला जागा नाही.
 
हॉलमध्ये गर्दी झाली की डानिंगमध्ये बसायला लागते. तिथे गर्दी झाली की जयाच्या बेडरुमध्ये बसावे लागते. आता फक्त माझ्या बेडरुमध्ये बसायचे बाकी आहे. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बाय मला हाकलून देईल. अजित पवार असे म्हणाले आणि एकच हशा पिकला.