खरा चाणक्य कोण तुम्ही की शरद पवार?

Sharad-Amit
नवी दिल्ली| Last Modified शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (13:28 IST)
विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर अमित शहा यांनी पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. यामध्ये तुम्हाला राजकारणातील चाणक्य म्हटले जाते, तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. असे विचारतानाच राजकारणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार असा थेट प्रश्नही केला गेला. यावर शहा यांनी दिलेले उत्तर सध चर्चेचा विषय ठरत आहे.
दिल्लीमधील भाजपच दारूण पराभवानंतर शहा यांची जादू फिकी झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. दोन वर्षांत सहा राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर शहा यांच्या चाणक्यनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीच्या आधी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप सत्तेपासून वंचित राहिला आहे. यामध्ये पवारांची भूमिका मोठी होती. त्या धर्तीवरच खरे चाणक्य कोण? तुम्ही की शरद पवार?
महाराष्ट्रातील निकालानंतर राजकारणातील चाणक्य शरद पवार आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर शहा यांनी उत्तर देताना म्हटले की, मी चाणक्यनीती खूप वाचली आहे. ती समजूनघेण्याचा प्रयत्नही केला आहे. चाणक्य यांच्याइतका मी महान नसून तसा विचारही करू शकत नाही. भगवान कौटिल्य (चाणक्य) यांच्याशी होणार्‍या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही. पवारांबाबत बोलाय चे झाल्यास ते दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारे पाडली आहेत. नवीन सरकारे स्थापनही केली आहेत. सध्या शहा यांची ही मुलाखत आणि चाणक्याशी तुलना केल्यावर दिलेले उत्तर व्हारल झाले असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला 161 जागा मिळाल्या होत्या
पण निकालानंतर मुख्यमंत्रिपदामुळे दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि युती तुटली. युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केले. यामध्ये पवार यांची भूमिका मोठी होती.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

राम मंदिरासाठी हिरे व्यापार्‍याने दिली 11 कोटींची देणगी

राम मंदिरासाठी हिरे व्यापार्‍याने दिली 11 कोटींची देणगी
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी गुजरात सूरतमधील एका हिरे व्यापार्‍याने 11 कोटी ...

परदेशी लसपेक्षा स्वस्त देसी लस, पंतप्रधान मोदींनी‍ सांगितले ...

परदेशी लसपेक्षा स्वस्त देसी लस, पंतप्रधान मोदींनी‍ सांगितले काय खास आहे ते जाणून घ्या
जगातील सर्वात मोठे लसीकरण आजपासून भारतात सुरू झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

मोठी बातमी, तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचे केले ...

मोठी बातमी, तक्रारदार महिलेने आपण माघार घेत असल्याचे केले ट्विट
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा ...

हरियाणा: सेवानिवृत्त कॅप्टनचा मृतदेह 5 दिवस घरात सडत होता, ...

हरियाणा: सेवानिवृत्त कॅप्टनचा मृतदेह 5 दिवस घरात सडत होता, सोबत राहणारा मुलगा म्हणाला- पापा अजूनही झोपले आहेत
हरियाणाच्या यमुनगर जिल्ह्यात हृदयविकाराची घटना समोर आली आहे. येथे भारतीय सैन्यात असलेले ...

रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड, रिझवान कुरेशी नामक ...

रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड, रिझवान कुरेशी नामक तरुणाला देखील छळले
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक ...