शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (16:13 IST)

भाजपा ही आपत्ती दूर करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं

Sharad Pawar
दिल्लीत लागलेल्या निकालावर आपले मत प्रकट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले की आता भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असं वाटत नाही. झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ यांच्याकडे बघता लोकं मोदी आणि शहा यांच्या अहंकाराला कंटाळले आहेत स्पष्ट दिसून येतेय.
 
धार्मिक भावना चेतवल्या गेल्या, गोळी मारा सारख्या घोषणा झाल्या, दोन समाजांमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला त्यामुळे जनतेने योग्य ते उत्तर दिलं आहे अस शरद पवार यांनी म्हटले. 
 
पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदनही केलं आहे.
 
भाजपा देशावरची आपत्ती असून ही आपत्ती दूर करण्यासाठी वेगळे प्रयोग झाले पाहिजेत. महाराष्ट्रात जो प्रयोग झाला तो अनेक राज्यांमध्ये होऊ शकतो. शरद पवार म्हणाले की किमान समान कार्यक्रमांवर विविध पक्षांनी एकत्र यायला हवं.