बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (13:39 IST)

शरद पवार 2024 साली पंतप्रधान होऊ शकतात - रोहित पवार

महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढल्यास 2024 शरद पवार भारताचे पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. औरंगाबादमधील कार्यक्रमात ते बोलते होते.  
 
"शरद पवारांवर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठं जातात, तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे त्याची माहिती घेतात," असं म्हणत रोहित पवार पुढे म्हणाले, "महाविकास आघाडी म्हणून लोकसभेत एकत्र येऊन लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही."
 
दरम्यान, यावेळी रोहित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. "भाजप नेत्यांनी सरकार फोडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही, त्यांना आशेवर राहू द्या," असं ते म्हणाले.