गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Updated : शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (12:40 IST)

Lal kitab astrology 2020 : आपली आयू 42 ते 48 या वयोगटातील असेल तर करा हे 5 उपाय

लाल किताबानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वर्षात आपला प्रभाव दाखवतो. आणि चांगले - वाईट फळ देतो. आपण 42 ते 48 वयोगटातील असल्यास आपण चांगले यश संपादनासाठी खालील 5 उपाय योजिले पाहिजे.
 
लाल किताबानुसार हे वयोगट राहू आणि केतूच्या आम्लाखालील असतात. केतू मुलं जन्माला आल्यावर सक्रिय होतो. हे दोन्ही ग्रह जागृत झाल्यावर शुभ किंवा अशुभ परिणाम देतात. हे ग्रह खराब असल्यास सावधगिरी बाळगली पाहिजे. काही उपाय योजना केल्यास इच्छित फळ प्राप्ती मिळू शकते.
 
सर्वप्रथम राहू साठी उपाय-
१ सासरच्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा.
२ कपाळावर चंदन किंवा केशराचा टिळा लावावा. नारळाच्या झाडाला पाणी द्यावे.
३ स्वच्छतागृहे, स्नानगृह आणि घरातील पायऱ्या नेहमी स्वच्छ ठेवाव्या.
४ दर गुरुवारी उपवास करावा. भोजन कक्षातच अन्न ग्रहण करावे. मांस - मद्यपानापासून लांब राहावे.
५ भैरव महाराजांना कच्चं दूध किंवा मद्य अर्पण करावे. दररोज हनुमान चालीसा पाठ करावा.
 
केतूसाठी उपाय- 
१. गणपतीची पूजा करावी.
२. चिंचेच्या आणि केळीच्या झाडाला पाणी द्यावे.
३ .कानात छिद्र करून त्यात सोन्याचा दागिना घालावा.
४  मुले हे केतूचे रूप असल्यामुळे त्यांच्याशी चांगले वागावे. 
५  दोन रंगाच्या कुत्र्याला पोळी खायला घालावी. काळं-पांढरं असे दोन रंग असलेलं कांबळे दान करावे.