शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (18:40 IST)

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले,चर्चेला उधाण

ठाण्यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस येत्या 9 फेब्रुवारी रोजी आहे. त्यांचा वाढदिवसा निमित्त ठाण्यात वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे काही बॅनर लावण्यात आले आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केला असल्याचे पोस्टर झळकल्यामुळे ठाण्यात  खळबळ उडाली आहे. 
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे पालक मंत्री आणि कोपरी पाकचपाखाडी मतदारसंघांचे आमदार आणि राज्य नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा येत्या 9 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्ते सध्या ठाण्यात सर्वत्र पोस्टर्स लावण्यात आले आहे. ठाण्यातील पाचपाखाडी येथे एकनाथ शिंदे यांचे राजकीय वर्चस्व मानले जाते. येथील मतदारसंघ तसेच शहरात अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टर्स मध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. या पोस्टर्समध्ये एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

या पूर्वी एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करणारे बॅनर विधानसभेच्या निवडणुकीनंतर देखील लावले होते. आता त्यांचा वाढदिवसानिमित्ते देखील बॅनर लावण्यात आले आहे.