एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा; ४० आमदारांचे समर्थन असल्याचे सांगत घेतला हा निर्णय

eknath shinde
Last Modified बुधवार, 22 जून 2022 (15:08 IST)
शिवसेनेतील बंडखोरीच्या राजकारण नाट्याने आता प्रचंड वेग घेतला आहे. गेल्या दोन-अडीच दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असून हा राजकीय डावपेच आणि चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरा शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांचे फोटोसेशन केले. आपल्याला ४० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.

आम्ही सर्व कट्टर शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच पुढे जाणार आहोत. अद्याप शिवसेना सोडली नाही. सोडणारही नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमके आता पुढे काय होते याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. या सर्व आमदारांचा एक ग्रुप फोटो व्हायरल झाला असून भाजपाचे वरिष्ठ नेते या सर्व आमदारांच्या संपर्कात असल्याने सत्ता महाराष्ट्रात सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो बाळासाहेबांनी दिलेले कडवट हिंदुत्व ही आमची भूमिका आहे. तीच आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातो आहोत. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. तसेच आम्ही शिवसेना सोडली नाही,आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढचे राजकारण समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे. त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जातो आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कालपेक्षा आज अधिक आक्रमक होत शिंदे यांनी आता पुढील पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसे झाले तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची चिन्हे आहेत. तसेच, स्वतंत्र गटाद्वारे शिंदे भाजपला समर्थन देतात की आणखी काही करतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचे डावपेच सुरू केले आहेत. भाजपाचे १०६ आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे कथित ४० आणि अपक्ष अशी युती करून भाजपा बहुमताचा १४५ चा आकडा पार करणार अशा दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

प्लास्टिकच्या थाळ्या, पेले, चमचे वापरत असाल तर सावधान, होऊ ...

प्लास्टिकच्या थाळ्या, पेले, चमचे वापरत असाल तर सावधान, होऊ शकते अशी शिक्षा आणि दंड
प्लास्टिकचा कचरा रिसायकल केला नाही, तर शेकडो वर्षं तसाच पडून राहू शकतो, हे आपण बोलत, ऐकत ...

Wimbledon 2022: राफेल नदालने विम्बल्डन ओपनची तिसरी फेरी ...

Wimbledon 2022: राफेल नदालने विम्बल्डन ओपनची तिसरी फेरी गाठून विक्रमी 307 विजय नोंदवला
स्पॅनिश टेनिसस्टार राफेल नदालचा शानदार प्रवास सुरूच आहे. विक्रमी 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा ...

Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra 2022 : ...

Babasaheb Ambedkar Swadhar Yojana Maharashtra 2022  : स्वाधार योजना  पात्रता,फायदे, उद्दिष्टये,  कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्ग (NP) विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल ...

फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी दिली ...

फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी दिली ही प्रतिक्रिया
भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला ...

नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाने वर्षभरात केले ४१५ ...

नाशिक क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाने वर्षभरात केले ४१५ कंपन्याचे बँक अकाऊंट सील
क्षेत्रीय भविष्य निधि नाशिक कार्यालय अंतर्गत साल २०२१-२२ या वर्षा मधे एकूण ३०६०४५ दावे २० ...