सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जुलै 2022 (21:08 IST)

एकनाथ शिंदे म्हणतात पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला

eknath shinde
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधील मुलाखतीतून पालापाचोळा असा उल्लेख करत बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलाय असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
 
त्यावेळी ते म्हणाले की, त्यांना आणखी काय बोलायचं आहे ते बोलू द्या, म्हणजे आपण एकत्रित काय ते बोलू. पण त्यांना वाटतंय की आम्ही पालापाचोळा आहोत. पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवलेला आहे. इतिहास घडवणारे कोण असतात, हे या जनतेला माहिती आहे. जनतेने हे पाहिले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही तर आमची लढाई ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.