शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (09:16 IST)

मविआच्या काळात किती कंपन्या गेल्या त्याची यादी जाहीर करणार- एकनाथ शिंदे

eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद अजूनही वाढत जाण्याच्या दिशेनेच प्रवास करत आहे. दोन्ही गट, त्यांचे कार्यकर्ते आणि नेते संधी मिळेल तेथे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे सभा घेऊन महाविकास आघाडी, ठाकरे गटावर टीका केली आहे. या भाषणात त्यांनी सर्व विरोधकांचा समाचार घेतला. मविआ सरकारच्या जाचाला कंटाळून किती कंपन्या बाहेर गेल्या याची यादीच जाहीर करू असा इशाराही शिंदे यांनी दिला. मविआच्या काळात थेट दाऊदची पाठराखण केली गेल्याचा आऱोप करत त्यापेक्षा मोदींचा हस्तक होणं चांगलं असंही शिंदे या भाषणात म्हणाले.