बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (09:50 IST)

कळस चोरणाऱ्यांना दोघांना दीड वर्षांनी अटक

लोणावळ्याजवळील कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणाऱ्यांना दोघांना अखेर अटक करण्यात आली आहे.  पुणे ग्रामीण पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे तब्बल दीड वर्षांनी पोलिसांच्या हाती यश आलं आहे. राहुल गावंडे आणि सोमनाथ गावंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघे औरंगाबादचे आहेत.
 
सोन्याचा मुलामा असलेला पंचधातूचा कळस ३ ऑक्टोबर २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास हा कळस चोरीला गेला होता. सुमारे एक लाख २५ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा मुलामा असलेला हा कळस एका भक्ताने दिला होता.