सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

येथे असेल देवघर तर शंभर टक्के पूजेचे शुभफळ प्राप्त होईल

देवघर म्हणजे अशी जागा जी घरातील पावित्र्य राखण्यात मदत करते. घरात देवघराला अत्यंत महत्त्व आहे कारण ही जागा अशी आहे जिथे पूजा केल्याने किंवा केवळ नमस्कार केल्याने देखील मनाला शांती प्राप्ती होते. 
 
सकारात्मकता अनुभवते. ही जागा अशी असते जिथे आपण मनमोकळेपणाने देवाशी संवाद साधतो, आपल्या चुका स्वीकारतो आणि त्याची माफी देखील मागतो. परंतू हे सर्व करताना त्याचा शत- प्रतिशत लाभ व्हावा यासाठी योग्य ठिकाणी देवघर असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पूजाघराची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य कोपरा अर्थात उत्तर- पूर्व दिशा.
 
ईशान्य कोपरा म्हणजे ईश्वरीस्थान. वास्तु पुरुषाचे शीर्ष उत्तरपूर्व दिशेत होते म्हणून देखील या दिशेला श्रेष्ठ मानले गेले आहे. घरातील ईशान्य कोपरा हा जास्तीत जास्त मोकळा असावा. हा कोपरा स्वच्छ, सुंदर व पवित्र ठेवावा. 
 
येथे देवघर स्थापित करणे शक्य नसल्याय पर्याय म्हणून उत्तर किंवा पूर्व दिशेची निवड करावी. कोणत्याही परिस्थितीत दक्षिण दिशा योग्य नाही कारण याने नकारात्मकता पसरते. तसेच घरात पायर्‍यांच्या खाली, शयनकक्षात किंवा शयनकक्षाजवळ, बेसमेंट येथे पूजा घर मुळीच नसावे. याने घरात क्लेश वाढतात आणि आर्थिक हानीला सामोरा जावं लागतं.
 
तसेच देव्हार्‍यातील सर्व देव - देवतांच्या मूर्तीचे तोंडे पश्चिमेस असाव्या. म्हणजे पूजा करणार्‍याचे तोंड पूर्वेस होईल. पूर्वीकडे तोंड करून पूजा केल्याचा शत प्रतिशत लाभ दिसून येतो.