सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

केवळ एक दिवा लावा, प्रत्येक संकटापासून मुकती मिळवा

योग्य दिशेत दिवा लावल्याने इच्छित काम पूर्ण होतात. तर जाणून घ्या कोणत्या समस्येसाठी कोणत्या दिशेत आणि कशा प्रकारे दिवा लावावा.
 
प्रत्येक कामात यश आणि प्रगतीसाठी तसेच घरात सुख-समृद्धीसाठी घरात दररोज तुपाचा दिवा लावावा. याने घरात सकारात्मक ऊर्जेची वृद्धी होते.
 
दिव्याची वात पूर्व दिशेकडे असावी याने सर्व आजार दूर होतात आणि आयू वाढते.
 
दिवा उत्तर दिशेकडे ठेवल्याने धनवृद्धी होते.
 
दिवा दक्षिण दिशेत ठेवल्याने अर्थ हानी होते. या गोष्टीचं विशेष लक्ष ठेवावे.
 
दिव्याची वात स्थिर असावी. आपल्या देवघरात देखील आपण दिवा लावू शकता.
 
स्वयंपाकघरात पाणी ठेवत असलेल्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा याने आरोग्य लाभ व धनवृद्धी होते. वाईट शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो.
 
कर्ज मुक्तीसाठी घरात दररोज तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. देवाला प्रार्थना करावी. तसेच दररोज पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा.