शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By

एकादशीला या 9 पैकी करा 1 उपाय, धन वाढेल

एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते.
एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. 
धन वृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढर्‍या मिठाईचे नैवेद्य दाखवावे. नैवेद्यात तुळस असावी. याने विष्णू प्रसन्न होतात.
या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे. याने कामातील अडथळे दूर होतील.
या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळं आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या. याने देवाची कृपा होते.
एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ऊँ वासुदेवाय नम: या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा घालाव्या. असे केल्याने घरामध्ये सुख-शांती राहते आणि संकट टळतात.
या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीविष्णूचा अभिषेक करावा. असे केल्याने धन वृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे. पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे. याने धन लाभ होण्याची शक्यता असते.