सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (10:21 IST)

प्रबोधिनी एकादशी महत्त्व, पूजा विधी

या दिवशी सकाळी लवकर उठून व्रत संकल्प घ्या आणि प्रभू विष्णूंचे ध्यान करा. 
स्नान इतरांनी निवृत्त होऊन घराच्या अंगणात प्रभू विष्णूंच्या चरणांची आकृति तयार करा. 
एका खळमध्ये गेरूने चित्र काढून फळं, मिठाई, बोर, शिंगाडे, ऋतुफळं आणि ऊस ठेवून त्याला टोपलीने झाकावे. 
रात्री घरात आणि बाहेर व पूजा स्थळी दिवे लावावे. 
रात्री घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रभू विष्णूंसह सर्व देवी-देवतांची पूजा करावी.
प्रभू विष्णूंना शंख, घंटा वाजून उठवले पाहिजे. 
देवउठनी एकादशीला दान, पुण्य करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे.
 
देवउठनी एकादशी मंत्र
“उत्तिष्ठो उत्तिष्ठ गोविंदो, उत्तिष्ठो गरुणध्वज।
 उत्तिष्ठो कमलाकांत, जगताम मंगलम कुरु।।”
अर्थात जगाचे पालनहार प्रभू विष्णू आपण जागृत व्हा आणि मंगळ कार्यांची सुरुवात करा.
 
 
देवउठनी एकादशी व्रत मुहूर्त 
देवउठनी एकादशी कार्तिक शुक्लपक्ष तिथीप्रमाणे 8 नोव्हेंबर 2019 रोजी आहे.
तिथी प्रारंभ: 7 नोव्हेंबर सकाळी 09:55 
तिथी समाप्त: 8 नोव्हेंबर रात्री 12:24 मिनिटांपर्यत