शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (15:40 IST)

जगन्नाथ पुरी धाम: 13 आश्चर्यकारक तथ्य

भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे देऊळ हे जगभरात प्रख्यात आहे. हे निव्वळ भारतातच नाही, तर परदेशी भाविकांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र आहे. देऊळाची वास्तू रचना इतकी भव्य आहे की वास्तू शास्त्रज्ञ लांबून लांबून या विषयी शोध घेण्यासाठी येतात. वाचकांसाठी येथे 13 आश्चर्यकारक तथ्ये सांगत आहोत.
 
1 पुरीच्या जगन्नाथ देऊळाची उंची 214 फूट आहे. 
 
2 पुरीमधील कोणत्याही जागेवरून आपण देऊळाच्या शिखरावर लागलेल्या सुदर्शन चक्राला बघितल्यावर ते आपल्या नेहमीच आपल्या समोरच दिसतं.
 
3 देऊळाच्या वरील लावलेला झेंडा नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो.
 
4 सामान्य दिवसाच्या वेळी वारं समुद्रापासून जमिनीकडे येते आणि संध्याकाळी ह्याचा उलट, पण पुरीमध्ये ह्याचा उलट होतं.
 
5 ह्याचा मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते.
 
6 वर्ष भर देऊळात अन्नछत्रासाठी अन्न शिजवले जाते. येथे बनत असलेल्या प्रसाद वाया जात नाही, आणि लक्षाधीश लोकं प्रसाद ग्रहण करतात. 
 
7 देऊळाच्या स्वयंपाकघरात अन्न शिजविण्यासाठी 7 भांडी एकमेकांवर ठेवले जातात. सगळं अन्न लकड्यांवर शिजवलं जातं. या प्रक्रियेमध्ये वरील भांड्याचे अन्न प्रथम शिजते नंतर खालील एकामागील एक एक भांड्यातील अन्न शिजतं. 
 
8 देऊळाच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल टाकताच आपण समुद्राच्या लाट्यांचा आवाज ऐकू शकत नाही. पण आपण देऊळाच्या बाहेर एक पाऊल टाकल्यावरच, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. संध्याकाळी हा आवाज स्पष्ट पणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो.
 
9 या देऊळाचे स्वयंपाकघर जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.
 
10 देऊळाचे क्षेत्र 4 लक्ष चौरस फूट आहे.
 
11 दररोज संध्याकाळी देऊळाच्या वरील रोविलेल्या झेंड्याला माणसाद्वारे उलटं चढून बदललं जातं. 
 
12 या देऊळाच्या वर आपल्याला एक ही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही.
 
13 या भल्यामोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविणारे 500 स्वयंपाकी आणि त्यांचे 300 मदतनीस एकत्ररीत्या काम करतात. सर्व अन्न मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलं जातं. 
 
आपले पूर्वज किती मोठे अभियंता असतील, ह्याचे ज्वलंत उदाहरण हे जगन्नाथ पुरीचे देऊळ आहे.