शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (10:54 IST)

महाराजांना मुले ऊसाने मारीत असे

चातुर्मासात श्रीगुरुमूर्तींच मारुती मंदिरात वास्तव्यास होतं. शेगावात उत्सव असल्याने सर्वभक्त मारुती मंदिरात श्रींच्या दर्शनास येत असत. महादजी शेगावचे पाटील होते. त्यांना दोन पुत्रे होती. कुकाजी पाटील आणि कर्ताजी पाटील.
 
 कुकाजी भगवंताचे भक्त असे. त्यांना संतान नव्हती. कर्ताजीनां सहा पुत्र होते. कर्ताजीच्या निधनानंतर कुकाजीने त्यांना वाढविले. उत्तम व्यवहारज्ञान दिले. सर्वे मुलं कुस्तीमध्ये पारंगत होते. खंडू, गणपत, नारायण, मारुती, हरी, कृष्णाजी त्यांचे नावं होते. ते सर्व फार उन्मत्त आणि दांडगे होते. ते महाराजांना तारुण्याच्या जोशात वेडावित. नाना तऱ्हेने त्रास देत असत. 
 
एकदा हरी पाटीलांने महाराजांची टवाळी करत म्हणाले- "ए गणू चाल माझ्या बरोबर कुस्ती खेळ." 
ह्या गोष्टीचा भास्कर पाटीलांना फार राग आला. ते महाराजांना म्हणाले- "चला आपण अकोल्यास जाऊ मला ही चेष्ठा सहन होतं नाही." महाराजांने शांतपणे त्यांना म्हटले की "अरे ही मुले माझीच भक्त आहे. पण पाटीलांचे पुत्र असल्याने ही अशी वागणूक राहणारच. तेव्हा धीर धर. वारंवारं असे घडत होते. 
 
एकदा महाराज हरी पाटीलांस म्हणाले- ''तू बलवान दिसतोस मला माझ्या बसलेल्या ठिकाणाहून उठव. हरी पाटीलाने कुस्तीचा डाव लावला आणि महाराजांना उठविण्यासाठी वृक्षाला जमीनीपासुन उपटावं तसा पूरजोर लावला. पण गुरुमूर्ती तिळभर सुद्धा हलली नाही. त्याने पुन्हा जोर लावला त्याला त्याची सर्व शक्ती निघून गेल्यासारखे झाले. त्याला महाराजांची खरी ओळख पटली. त्याने त्यांचा पायांवर लोटांगण घातलं आणि क्षमा याचना केली ."तेव्हा महाराज म्हणाले- "अरे तू पाटीलांचा पोर आहेस. तेव्हा सगळ्यांना तू कुस्ती शिकवून तयार कर. हेच आम्हास तू वचन दे." त्याने महाराजांच्या सांगण्या प्रमाणे मुलांना कुस्ती शिकवून तयार केले आणि महाराजांचे असीम भक्त झाले.
 
हे सर्व बघून हरी पाटीलांच्या इतर भावांना आश्चर्य वाटे व आपण पण ह्या पिशाची परीक्षा घेऊ असे आपापसात म्हणाले. एकदा गुरुमूर्ती स्वस्थ बसलेले असता हे सर्व ऊस घेऊन त्यांना मारण्यास आले व सर्वांनी प्रहार करण्यास सुरुवात केली परंतु एकही वळ महाराजांच्या अंगावर उठले नाही. सर्व ऊसांचे तुकडे झाले. मुलेही दमली. गुरुमूर्ती शांत बसली होती. मुलांना दमलेले बघून ते म्हणाले- "बसा, दमलात ? आता तुम्हास रसपान करवितो." असे म्हणून ऊसाची मोळी करून पिळली आणि मुलांना रसपान करविले. सगळी मुले श्रींच्या चरणी लीन झाली. त्यांने महाराजांचा जयजयकार केला आणि श्रींचे भक्त झाले. खंडू पाटील तर त्यांचा दर्शनास रोज येत असे. त्यांना अपत्य नव्हते. महाराजांच्या कृपेने त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.