कोरडी विहीर पाण्याने भरली

gajanan maharaj
Last Modified मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (16:15 IST)
गजानन महाराजांची कीर्ती एकूण शेगावला अनेक लोक त्यांचा दर्शनासाठी येत असे. शेगावात खूप गर्दी व्हायची. त्या गर्दीला टाळण्यासाठी जवळच्या गावात महाराज निघून जायचे. अरण्यात फिरत असे.

असेच एकदा महाराज सोडून आडगावाकडे निघाले असताना महाराजांना तहान लागली. आजूबाजूस कुठेही पाणी दिसते का ? ते बघू लागले. जवळच्या शेतात एक शेतकरी काम करत असे. त्याच्याकडे पाण्याची लहानशी घागर असे.

महाराज म्हणाले, ''मला थोडे पाणी प्यायला दे.'' तेव्हा शेतकरी महाराजांना बघून म्हणू लागला की मी लांबून स्वत:साठी पाणी घेऊन आलो आहे त्यामुळे हे पाणी तुला दिल्यास मला पुरणार नाही. आपल्याला पाणी कमी पडेल म्हणून शेतकऱ्याने पाणी द्यायचे नाकारले. तेथून जवळच एक कोरडी विहीर होती. महाराज विहीरीकडे निघाले. तेव्हा शेतकरी म्हणाला की विहीर पूर्णपणे कोरडी आहे.
त्यावर महाराज म्हणाले, ''असू दे. प्रयत्न करून बघतो; अकोल्यातील लोकांचे पाण्याचे हाल दूर करता येते का ?''

मग महाराज विहिरीजवळ आले. विहिरीच्या काठावर पद्मासन घालून परमेश्वराचे ध्यान करू लागले आणि काय आश्चर्य ! थोड्याच वेळात विहिरीतील झऱ्यांना पाणी आले. झरे वाहू लागले. क्षणात विहीर पाण्याने तुडुंब भरुन गेली.

शेतकऱ्याला फारच आश्चर्य वाटले. त्याने महाराजांचे पाय धरले. महाराजांचे सामर्थ्य शेतकऱ्याला समजले. त्याने सर्व लोकांना ही हकीकत सांगितली.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य ...

चैत्र पौर्णिमा 2020 : या पौर्णिमेला हे 5 कार्य करा, पुण्य लाभेल
चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला आहे. त्यामुळे ही पौर्णिमा खासच आहे. चैत्र पौर्णिमेला ...

भगवान महावीर यांचा जीवन परिचय

भगवान महावीर यांचा जीवन परिचय
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक होते. वैशाली ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये ...

हनुमान जयंती विशेष : मारुतीच्या जन्माच्या वेळेची 6 रहस्ये जाणून घ्या
रामभक्त हनुमान हे सर्व शक्तिमान आणि सर्व ज्ञानी आहे. संशोधनाच्यानुसार प्रभू श्रीराम यांचा ...

देवी दुर्गे.... भवानी

देवी दुर्गे.... भवानी
गिरीजाबाई खूप आशेनी येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांकडे बघत होती. गेल्या चार दिवसांपासून तिच्या ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, ...

रामाला गंगा पार करवणारा केवट पूर्वीच्या जन्मी होता कासव, जाणून घ्या रोचक कथा
केवट यांनी आपल्या नावेत प्रभू श्रीरामाला गंगेच्या पलीकडे सोडले होते. केवट यांनी प्रथम ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...