1. धर्म
  2. हिंदू
  3. सण
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जून 2020 (18:45 IST)

Vat Purnima Vrat 2020: वट सावित्री व्रत पूजा विधी

Vat Purnima Vrat 2020 puja vidhi
वट सावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं. वटवृक्षात शिव - विष्णू व ब्रम्हाचे वास्तव्य असते. 
 
पूजा विधी 
वट पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी पहाटे लवकर उठून स्नानादी कर्म उरकून नवीन वस्त्र परिधान करावे. ह्या दिवशी संपूर्ण शृंगार करण्याचे महत्त्व आहे. पूजेचं 
 
सामान सोबत घेऊन महादेवाच्या मंदिराजवळ असणार्‍या वडाच्या झाडाची पूजा करावी. 
 
वडाच्या झाडाखालील जागा सारवून घ्यावी. मातीने सत्यवान व सावित्रीची मूर्ती तयार करुन त्यांची स्थापना करावी. त्यांचे मनोभावे पूजन करावे. सत्यवान व सावित्रीस लाल 
 
कापड व फळ अर्पण करावे. 
 
पूजा झाल्यावर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच घरात सुख-समृद्धी नांदो अशी प्रार्थना करावी. 
 
यानंतर वटवृक्षाची पूजा करावी. आधी त्यावर पाणी शिंपडावे आणि झाडासमोर दीप प्रज्ज्वलित करावा. वटवृक्षाभोवती लाल सुती दोरा सात वेळा गुंडाळावा. हे करत असता 
 
भगवान शंकर आणि विष्णू मंत्रांचा जप करावा.
 
पूजास्थळी सावित्री व्रतकथेचे पठन करावे किंवा ऐकावे. यथाशक्ती फळे विशेष करुन आंबा आणि इत्यादींचे सवाष्णींना तसेच गरीब मुलांना वाटप करावे. या दिवशी ब्राह्मणास 
 
यथाशक्ती दान करावे.
 
वटपौर्णिमा मुहूर्त 
यंदा शुभ मुहूर्त 5 जून रोजी रात्री 3 वाजून 17 मिनटांपासून सुरु होऊन 6 जून रोजी मध्य रात्री 12 वाजून 41 मिनिटाला संपत आहे. म्हणून व्रती 5 जून रोजी दिवसाला 
 
कोणत्याही काळात मनोभावे वटवृक्ष, यमराज आणि सावित्रीचे पूजन करु शकतात.