संबंधित माहिती
- Shri Swami Samarth Naivedya श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष नैवेद्य पाककृती
- Swami Samarth Prakat Din 2026 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?
- श्री अक्कलकोट स्वामी महाराज स्तोत्र
- Shri Swami Samarth Temple लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट
- अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती
Shri Swami Samarth Maharaj Prakat Din 2026 Wishes in Marathi श्री स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा संदेश मराठी
"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..."
हा अभयमंत्र देणाऱ्या अक्कलकोटनिवासी
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
॥ श्री स्वामी समर्थ ॥
ज्यांच्या स्मरणाने दुःख हरते आणि संकटात धिर मिळतो,
अशा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत!
प्रकट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
अक्कलकोट निवासी पूर्णब्रह्म अवतार
जगद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज
यांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी चरणी प्रार्थना की,
तुमचे आयुष्य सुख-समृद्धीने आणि समाधानाने भरून जावो!
स्वामी समर्थ!
"अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय!" प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अशक्य ही शक्य करतील स्वामी! श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय जय स्वामी समर्थ!
निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी! श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या मंगल शुभेच्छा!
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक नमन आणि शुभेच्छा! त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहो.
स्वामींचे नाम जपता जपता, आयुष्य आनंदमय होईल! प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय स्वामी समर्थ!
हे दिवस स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन साजरा करा, नामस्मरण करा आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवन उजळवा! जय स्वामी समर्थ!
स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन, डोळे मिटून जेव्हा नामस्मरण करतो, तेव्हा प्रत्येक दुःख वितळून जाते आणि हृदयात फक्त प्रेम उरते... श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वामींच्या कृपेने तुझं आयुष्य सुख, शांती आणि भक्तीने भरून राहो. भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. हार्दिक शुभेच्छा!
आजच्या या मंगल दिवशी, स्वामींच्या प्रेमळ कृपेने तुझ्या मनातील प्रत्येक अंधकार दूर होवो, आणि जीवन फुलून येवो प्रेमाने आणि आनंदाने. जय जय स्वामी समर्थ!
स्वामींच्या दृष्टीत प्रत्येक भक्त मुलगा-मुलगीच आहे त्यांच्या प्रेमात कधीही भेदभाव नाही, फक्त अटळ विश्वास आहे. या प्रकट दिनी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की, तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण स्वामींच्या स्मृतीने सुगंधित होवो, संकटे दूर पळून जावोत आणि हृदय सदैव त्यांच्या नामाने धडकत राहो. मनःपूर्वक शुभेच्छा आणि नमन!
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे..." हे वचन ऐकताच डोळे पाणावतात, कारण हे प्रेम इतके खोल आहे की, जगाच्या कोणत्याही दुःखाला तोड देतं. स्वामी समर्थांच्या या प्रेमळ कृपेने तुझं आयुष्य नेहमी सुखी, निरोगी आणि भक्तिमय राहो. प्रकट दिनाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा! जय स्वामी समर्थ!
हे दिवस स्वामींच्या नामस्मरणात, भक्तीत आणि त्यांच्या आशीर्वादात साजरा करा. त्यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो!
"स्वामींच्या चरणी नतमस्तक... प्रकट दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!"
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: श्री स्वामी समर्थ मालामंत्र
पुढील लेख
