रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (14:42 IST)

जि.प. आणि पंचायत समितीसाठी दुसर्‍या टप्प्यातील उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरु SS

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दुसर्‍या टप्प्यात बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली  आहे. दुसर्‍या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांची निवडणूक दुसर्‍या टप्प्यात म्हणजेच 21 फेबु्रवारी रोजी होत आहे. यासाठी 1 फेबु्रवारीपासून अर्ज स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात अर्ज स्वीकृतीची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आतापासूनच उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवारांची यादी घोषित करण्यात आलेली नाही. उमेदवारांना शौचालय वापराचा ठराव नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. असा ठराव अर्जासोबत न जोडल्यास उमेदवारी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. ज्या जागेसाठी अर्ज भरायचा आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट काढावी लागेल. अर्जाची नोटरी करून योग्य ती कागदपत्रे सोबत जोडून तो अर्ज सादर करावा लागेल. ज्या ठिकाणी राखीव जागेवर निवडणूक लढवायची आहे त्या जागेवरील इच्छुक उमेदवाराने स्वतःच्या जातीचा दाखला सोबत जोडणे आवश्यक आहे.