बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (17:37 IST)

राज यांचा अल्टीमेटम : १६व्या दिवशी मोर्चा शांततेत होणार नाही

राज ठाकरे यांनी आज मुंबई येथे मोठा महामोर्चा काढला होता. यामध्ये मुंबईत  रेल्वे विरोधात हा मोर्चा काढला होता. या मोर्चात राज ठाकरे यांनी  रेल्वेला अल्टीमेटम दिला आहे. यामध्ये राज यांनी १५ दिवसात सर्व रेल्वे प्रशासनाला सुधारणा करा आणि सर्व फेरीवाले आणि अतिक्रम करणारे यांना काढा असा निवेदन वजा इशारा दिला आहे. मात्र १६ व्या दिवशी मनसेचे अशांत आंदोलन होणार असा सज्जड दम दिला आहे. यामुळे रेल्वे प्रशासन हादरल आहे. यावर आता रेल्वेने कारवाई सुरु केली आहे. राज ठाकरे यांचे पूर्ण भाषण खालील प्रमाणे :
मेट्रो ऐकलं बरं झालं, मित्रो ऐकलं असतं तर कुणी आलं नसतं : राज ठाकरे
आजचा मोर्चा हा रेल्वेपुरता मर्यादित नाही सरकार बदललं तरी परिस्थिती जैसे थे म्हणून माझा संताप मोर्चा आहे. किड्या-मुंग्यांसारखी माणसं मरतायत आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका काय करायच्या? रेल्वे स्टेशनवरुन 15 दिवसात फेरीवाल्यांना हटवा, अन्यथा माझी माणसं त्यांना हटवतील. महिलांसाठी गाड्या वाढवा सांगितलं तर अधिकारी लिहून घेत होते, जसं आम्ही काही नवं सांगितलं, तुम्हाला नाही कळत?नितीन गडकरी म्हणतात, अच्छे दिन म्हणजे घशात अडकलेलं हाडूक, ते त्रास देतंय, म्हणजे अच्छे दिन येणार नाहीत,माझ्यासह या देशाने मोदींवर विश्वास टाकला, पण विश्वासघात झाला, म्हणून जास्त राग आला आहे. लोक सांगतात की मोदींचा आवाज ऐकायला आला की टीव्ही बंद करावासा वाटतो.व्यक्ती म्हणून मोदींशी देणंघेणं नाही, पण ते आधी एक बोलत होते, आता एक बोलत आहेत. हे सर्व चुकीचे आहे. आजचा मोर्चा शांततेत, बदल झाला नाही तर पुढचा मोर्चा शांततेत नसेल न्यायाधीशांना विनंती, सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नका, सरकार बदलत असतात, योग्य निर्णय घ्या. असे राज यांनी सरकारला सांगितले आहे.