बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (14:10 IST)

तिची प्रसूती बसस्थानकावर, महिलांनी केली मदत

बसस्थानकावर अनोळखी महिलांनी केली तिची प्रसूती,  या महिलेला कोणी ओळखत नव्हत आणि कोणी सोबत नव्हते तर त्या अवघडलेल्या अवस्थेत असलेल्या एका महिलेची प्रसूती करण्यासाठी दुसऱ्या  अनोळखी महिला धावल्या  आहेत. त्यांनी सोबत येत सुखरूप प्रसूती  केली असून माणुसकीचा हा पाझर सोलापूर बसस्थानकावर बुधवारी सकाळी पाहायला मिळाला़ आहे. यामध्ये महिला कविता विनोद राठोड (२५, रा़ दुधनी, ता़ अक्कलकोट) गर्भवती  होती तर ती  पुण्याहून अक्कलकोट तालुक्यातील दुधनीगावाजळील बळोरगी तांड्याकडे निघाली होती. हा प्रवास करतांना सोलापूरच्या बसस्थानकावरील फलाट क्रमांक १४ वर उभी होती. तर विशेष म्हणजे तिच्यासोबत दोन लहान मुलेही प्रवास करत होती  होती. या वेळी अचानक तिला प्रसूतिवेदना सुरू झाल्या होत्या. सुरक्षारक्षक लक्ष्मण जाधव यांनी बसस्थानक परिसरात किरकोळ विक्रेत्या करणाºया महिलांना बोलाविले़ त्यांनी ताबडतोब साड्या मागवून तिला आडोसा केला़ होता. या वेळी लातूरकडे जाणाºया प्रवासी महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी त्यांना मदत केली आणि भर स्थानकावरच कविताने एका मुलाला जन्म दिला आहे. यामुळे या महिला आणि नागरिकांचे कौतुक होत आहेत.