सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2017 (12:47 IST)

इगतपुरी येथे मिटिंगदरम्यान अर्धनग्न डान्स पार्टी

मुंबई - आग्रा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील  रेन फॉरेस्ट नामक  हॉटेलात रात्री पोलिसांना छापा टाकून रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी  मंगळवारी रात्री  ही कारवाई  केली आहे. यामध्ये  इगतपुरी पोलिसांनी नऊ तरुण आणि अर्धनग्न  तरुणींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलिसांना स्थानिक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.  हॉटेलात उच्चभ्रू घरातील काही तरुण आणि तरुणी मद्याच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत नाचत होते आणि झिंगत होते. यामध्ये इगतपुरी येथे पुण्याच्या जी.एम.बायोसाईड कंपनीच्या डीलर्स मिटिंगदरम्यान  हा सर्व प्रकार झाला हे उघड झाले आहे. या प्रकरणी बायोसाईड कंपनीचे भोर तालुक्यातले दोन व्यवस्थापक, संगमनेरचे एक व्यवस्थापक आणि नाशिकचे एक संचालक असे चार मुख्य अधिकारी तसंच विविध जिल्ह्यातील वितरक अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये सर्व संशयित आरोपींना आज कोर्टात हजर करणार असून यामध्ये पकडलेल्या अर्धनग्न मुलीना महिला सुधार गृहात पाठवले आहे.