संबंधित माहिती
- राज्यात आजपासून 12वीच्या परीक्षा, सेंटरवर जाण्याआधी हे नियम वाचा
- बिग मी इंडिया प्रा. लि. कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणतोय ‘बायको मला सोडून गेलीय !
- हा महाराष्ट्रचा अपमान झाला आहे : आदित्य ठाकरे
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि OBC आरक्षणाबाबत भाजपची ही आहे भूमिका
- यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना कंत्राट देताना घोटाळा केला : सोमय्या
गोवा राज्यातून आणलेली अकरा लाखांची विदेशी दारू घोडेगावात जप्त
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे जप्त करण्यात आला. दामू पुंजाराम जाधव (वय 42 वर्ष) व रामू पुंजाराम जाधव (वय ४५), राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव परिसर, अहमदनगर येथून सदर साठा जप्त करण्यात आला.
परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने पुढील तपास सुरु आहे.
