यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना कंत्राट देताना घोटाळा केला : सोमय्या
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यांच्या घरातून दोन कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी ४०० कोटींच्या घोटाळ्यात तीन नेत्यांसह ५ कंत्राटदारांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबई पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांना कंत्राट देताना घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली असून चारशे कोटींच्या घोटाळ्यात तीन नेते, तीन मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि ५ कंत्राटदारांचा देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
यशवंत जाधव यांच्या घरी लगातार चार दिवसांपासून आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गैरव्यवहार आणि मनी लॉड्रिंगचा आरोप यशवंत जाधव यांच्यावर करण्यात येत आहे. या छापेमारीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे आणि २ करोड रुपये रोख जप्त करण्यात आली असल्याची माहिती दिली जात आहे.