मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 3 मार्च 2022 (15:34 IST)

गाईने एकावेळी तीन वासरांना जन्म दिला

सरूड तालुका शाहूवाडी येथील विक्रम बाळासो लाड यांच्या गायीने एकाच वेळी तीन वासरांना जन्म दिला आहे. हे तिन्ही बछडे निरोगी असून गाय देखील स्वस्थ आहे. सरूड परिसरातील ही घटना सर्वांना हैराण करत आहे.
 
सरूड येथील शेतकरी विक्रम लाड यांच्याकडे जर्सी गाय असून गुरुवारी सकाळी ही गाय व्याली. गायीने पहाटे चार वाजता एका वासराला, नंतर सकाळी सहा वाजता दुसऱ्या वासराला आणि एक तासाच्या कालावधीनंतर सकाळी सात वाजता तिसऱ्या वासराला जन्म दिला. त्यात दोन पाडी व एक कालवड आहे.
 
येथील नागरिक मोठ्या कुतुहलाने ही वासरे पाहण्यासाठी येत आहे.
photo: social media