शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 मार्च 2022 (15:10 IST)

राणे पिता-पुत्र ‘या’ तारखेला पोलिस ठाण्यात उपस्थित राहणार

दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे  यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. मात्र त्यांच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली आहे. त्यामुळे राणे पिता-पुत्र आता ५ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत मालवणी पोलिस ठाण्यात उपस्थित राहाणार आहेत.
 
दिशा सालियन   प्रकरणी झालेल्या वक्तव्याबाबत दिशाच्या आईने मालाड पश्चिमच्या मालवणी पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मालवणी पोलिस याच प्रकरणाचा तपास करत आहेत.याअंतर्गत ३ आणि ४ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे  यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. मात्र राणे कुटुंबीयांचे वकील सतीश मानशिंदे यांनी पोलीस ठाण्यात पत्र लिहून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यामुळे वेळ वाढवून मागितली होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र दोघेही ५ मार्च रोजी पोलीस ठाण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.