शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (15:43 IST)

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर दिवसभरासाठी ताप्तुरती टोल माफी करण्यात आली

moshi toll naka
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्यांना ताप्तुरती टोल माफी करण्यात आली आहे. महामार्गावर सुरु असलेलं काम, गणेशोत्सवानिमित्त होणारी संभाव्य गर्दी या सगळ्याच्या पार्श्वभूमीर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन प्रवास करणाऱ्यांना तूर्तास टोल आकारु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
 
दिवसभरासाठी ही टोलमाफी असणार आहे. शनिवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर वाहतूकीची कोंडी ही ठरलेलीच असते. त्यात महामार्गावर सुरु असेललं काम पाहता, ही कोंडी अधिकच वाढली आहे. सकाळपासूनच मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे शनिवारी दिवसभरासाठी मुंबई पुणे महामार्गवरुन टोल आकारला जाऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.