बुधवार, 1 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (15:40 IST)

कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे? मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा सवाल

marath kranti morcha
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संभाजीराजे छत्रपतींचं नेतृत्व मान्य नसल्याची भूमिका घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. “नेतृत्व करण्याची जबाबदारी यांना दिली कुणी? कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे? आम्हाला अजिबात मान्य नाही. आमचं कुणीही नेतृत्व नाही हे आम्ही पहिल्यापासून सांगितलं होतं. छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व. तुम्ही रात्रीच्या अंधारात बैठका घेता, नेमकं चाललंय काय तुमचं?” असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी उपस्थित केला आहे.
 
“मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कुणीही नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरातून तो सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. जवळचा एखादा माणूस हाताशी धरून आणि त्या नेतृत्वाला पुढे करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल अशी तुमची अवस्था केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.