50 खोकेच काय 50 रुपये जरी घेतले असतील तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन- दीपक केसरकर
सध्या विधिमंडळाचं अधिवेशन होतंय. अशात 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके. अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत.
"एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पैसे देण्यात आले. 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलंय. 50 खोके काय 50 रुपये जरी घेतले असतील तर राजीनामा देईन," असं दीपक केसरकर म्हणालेत.
"सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतलेले असलेले तरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो," असं केसरकर म्हणाले.