मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (16:26 IST)

50 रुपयांना 100 किलो कांदा, अशी कसली मजबुरी… शेतकऱ्यांचे डोळ्यात आले अश्रु

काही काळापूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. मध्य प्रदेशातील मंदसौर कृषी उपज मंडईमध्ये शेतकऱ्यांना 100 किलो कांदा 50 रुपयांना विकावा लागत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदसौरच्या बाजारपेठेत शेतकरी आपले पीक विकण्यासाठी मंदसौरला पोहोचला, तेव्हा व्यापाऱ्याकडून मिळालेले बिल पाहून शेतकऱ्याचे हृदय पिळवटून निघाले. व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून 50 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी केला आहे. किलोच्या हिशेबाने शेतकऱ्याला कांद्याला प्रतिकिलो 50 पैसे मिळाले आहेत. या भावात कांदा विकून आपला खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 
त्याचवेळी 50 रुपये प्रतिक्विंटल कांद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच ती स्लिप देखील व्हायरल झाली आहे, जी शेतकऱ्याला त्याचे पीक विकल्यानंतर मिळाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता शेतीवर अवलंबून राहून उदरनिर्वाह कसा करायचा, हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पादित केलेल्या पिकांना योग्य भावही मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, अशा परिस्थितीत भविष्यात त्यांच्यावर मोठे संकट उभे राहू शकते. यासाठी सरकारने ठोस धोरण आखण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 
योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले
नुकतेच मंदसौर मंडईत शेतकऱ्यांनी लसणाला योग्य भाव न मिळाल्याच्या निषेधार्थ जाळले होते. जेव्हा शेतकरी आपले पीक घेऊन बाजारात पोहोचला तेव्हा त्याला योग्य भाव मिळाला नाही. रागाच्या भरात शेतकऱ्याने लसणाच्या पोत्यात पेट्रोल टाकून पेटवून दिले. आमचा खर्चही निघत नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला.