1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (10:02 IST)

LPG सिलेंडर झाला स्वस्त, जाणून घ्या 1 जानेवारी 2022 ला काय आहे नवीन दर

LPG Cylinder Price 1st January 2022
नवीन वर्षात गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. ही कपात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरवर करण्यात आली आहे. IOCL च्या मते, 1 जानेवारी 2022 रोजी दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 102 ते 1998.5 पर्यंत खाली आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत दिल्लीकरांना 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी 2101 रुपये मोजावे लागत होते. चेन्नईत आता 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 2131 रुपये, मुंबईत 1948.50 रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन किंमती जाहीर झाल्यानंतर, कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर आता आजपासून 2076 रुपयांना खरेदी करता येणार आहेत.
 
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही
 
नवीन वर्षात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळेच राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या लोकांना घरगुती गॅस सिलिंडर 900 रुपयांना विना सबसिडी मिळत राहतील. इतर शहरांमध्ये काय दर आहेत ते जाणून घेऊया-
 
घरगुती एलपीजी सिलेंडरचे नवीनतम दर
 
शहर 14.2 किलो सिलेंडरचा दर रुपयात (राउंड फिगर )
दिल्ली 900
मुंबई 900
कोलकाता 926
चेन्नई 916
लखनऊ 938
जयपुर 904
पटना 998
इंदौर 928
अहमदाबाद 907
पुणे 909
गोरखपुर 962
भोपाल 906
आगरा 913
रांची 957
स्रोत: इंडियन ऑयल