शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (10:53 IST)

नाव 'राष्ट्रवादी' असलं, तरी तो पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष - फडणवीस

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय.
"पवारांचा पक्ष असा आहे की, पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाए उसके जैसा. ते कधी समाजवादी पक्षाशी संवाद साधतात, कधी तृणमूलशी संवाद साधतात," असं म्हणत फडणवीसांनी पुढे राष्ट्रवादी 'पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष' असल्याचं म्हटलं.
"राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्ष नाही, त्यांचं राष्ट्रीय अस्तित्व नाही, राष्ट्रीय विचारही नाहीत, नाव राष्ट्रवादी असलं तरी तो पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष आहे," असं फडणवीस म्हणाले.
"शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाला ते दाखवणं गरजेचं आहे. गोव्यात थोड्या जागांवर लढण्याचा विचार करत असले तरी त्यांचा कुठलाही फायदा होणार नाही," असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया आलेली नाही.