बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 जानेवारी 2022 (10:11 IST)

दागिन्यांसाठी 3 वृद्ध महिलांचा निर्घृण खून

दापोलीत हृदयद्रावक घटना घडली आहे. दागिन्यांसाठी तीन वृद्ध महिलांचा निर्घृण खून केल्यामुळे दापोली तालुका हादरलं आहे. चोरटयांनी या महिलांच्या अंगावरील दागिने काढून नेल्याचे गुन्ह्यात नोंद केले आहेत. दापोली पोलिसांनी चोरीचे प्रकरण म्हणून या घटनेची नोंद केली आहे. सत्यवती पाटणे , पार्वती पाटणे, आणि रुक्मिणी पाटणे असे या मयत महिलेंची नावे आहेत.  या महिलांचा डोक्यात प्रहार करून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. 
ही घटना दापोलीच्या वणोशी गावाच्या खोतवाडी येथील आहे. येथे एका घरात या तिघी महिला राहत होत्या. थंडीचे दिवस असल्याने सकाळी या गावातील लोक आपल्या घराच्या बाहेर उन्हात बसतात. दररोज प्रमाणे या महिला घराच्या बाहेर दिसल्या नाहीत. लोकांनी घराचे दार वाजविले पण आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. मागील दारातून आत गेल्यावर या महिलांचे मृतदेह आढळले. समोरच्या विनायक पाटणे यांनी इतर गावकरींना ही बाब सांगितल्यावर पोलिसांना कळविले पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहे.