1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (21:07 IST)

दुकानातील लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे एक जण ठार

One person was killed when an elevator in the shop collapsed on the third floorदुकानातील लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे एक जण ठार Marathi Regional News In Webdunia Marathi
अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्यामुळे एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत.
ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. शिवम भाऊसाहेब झेंडे (वय १९) असे मयत युवकाचे नाव आहे. या अपघातात ओंकार अरूण निमसे (वय १९), प्रिया सचिन पवार (वय ४०) व शीतल शेषेराव चिमखडे (वय २४) हे जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड आवारातच अभय मशिनरी नावाचे तीन ते चार मजली दुकान आहे. याठिकाणी शेतीसाठी लागणारे औजारे मिळतात.
या दुकानात लिफ्टही बसविण्यात आलेली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यात लिफ्टमधील एक जण ठार झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ही लिफ्ट कशामुळे कोसळली याची माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. कोतवाली पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. याबाबत तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे व त्यांच्या पथकाने पाहणी केली.