1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:36 IST)

जिल्हा बँकेवर 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रा. दिंगबर दुर्गाडे यांचं नाव निश्चित केलं आहे. दिंगबर दुर्गाडे यांनी  यापूर्वी देखील जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे  यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.  अजित पवार सर्व निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेत नाव निश्चित केलं आहे. जिल्हा बँकेवर 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवल आहे.
 
अजित पवार यांनी  बँक संचालक यांच्यातील जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबतची बैठक संपली आहे. जवळपास एक तास संचालकांशी अजित पवारांनी चर्चा केली आहे. 
 
पुणे जिल्हा बँकेवरील संख्याबळ
राष्ट्रवादी – 17
काँग्रेस – 02
भाजप – 02
 
प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे , पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार , खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील , “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे , इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.