मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (21:25 IST)

जिल्हा बँक अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव नाईक निश्चित

फोटो  साभार-सोशल मीडिया  
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी 6 रोजी होत असून अध्यक्षपदासाठी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर उपाध्यक्षपदासाठी सांगलीतील काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते. उद्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवडी होणार आहेत.
जिल्हा बँकेच्या अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत विकास महाआघाडीने 21 पैकी 17 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले आहे तर विरोधी भाजपाचे चार संचालक निवडून आले आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.