शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 6 डिसेंबर 2021 (20:47 IST)

Omicron: राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली 10 वर

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची लागण झालेल्या राज्यातील रुग्णांची संख्या 10 झाली आहे. मुंबईत ओमिक्रोनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दोन्ही रुग्णांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू होणार का यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील आठ दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
ओमिक्रॉनचा धोका, त्याचे गुणधर्म समजून घेऊन आगामी आठ-दहा दिवसांत निर्बंधांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिले. तूर्तास मास्क, सोशल डिस्टन्स, लसीकरण व हाताची स्वच्छता या चतु:सूत्रीवर भर राहील, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज ही संख्या 10 वर पोहोचली आहे.
24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 44 वर्षीय महिला पिंपरी-चिंचवडला आली. तिच्यासोबत आलेल्या तिच्या दोन मुली, पिंपरी-चिंचवडला राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन मुली अशा एकूण सहा जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे.नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी पिंपरी-चिंचवडला आली. या तिघींच्याही प्रयोगशाळा नमुन्यात ओमिक्रॉन विषाणू आढळला. यानंतर त्यांच्या 13 निकटवर्तीयांची चाचणी करण्यात आली. यात महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड आणि सात वर्षांच्या मुलींनाही ओमिक्रॉनची बाधा झाल्याचं समोर आलं.
या सर्व रुग्णांवर जिजामाता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.पुणे शहरातील 47 वर्षीय पुरुषालाही नवीन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितलं आहे.पुणे शहरात आढळलेल्या रुग्ण 18 ते 25 नोव्हेंबर या काळात फिनलंड येथे गेला होता. 29 तारखेला त्याला ताप आला होता. त्याने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते.
महाराष्ट्रात शनिवारीओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला होता.
हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. मात्र त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे,