1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (16:50 IST)

ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर राजा पाटील यांचे निधन

तमाशा क्षेत्रातून लोकप्रबोधन करणारे गेली चाळीस वर्षे लोकनाट्य कलेची सेवा देणारे  शाहिर राजाराम यशवंत पाटील उर्फ राजा पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. लोकशाहीर राजा पाटील हे लोकनाट्य मंडळाचे संस्थापक होते च्या निधनाने तमाशाच्या क्षेत्रात दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. 
त्यांनी आपल्या तमाशा आणि शाहिरीने लोककला अवघ्या महाराष्ट्रात सादर करून लोककलेचा जागर केला. त्यांच्या विद्रोही लेखणीतून तमाशा क्षेत्रात लोकप्रबोधन करायचे. 
त्यांनी बारा हजाराची कमळी, तुकोबा निघाले वैकुंठाला, कवठे महांकाळची लावणी, साहित्य लिहिले, तसेच  रक्ताची आन, आब्रूचा पंचनामा, हे नाटक गाजले, रक्तात न्हाली आब्रू, 'इंदिरा काय भानगड, डॉ शर्मा, भक्त पुंडलिक, टोपीखाली दडलंय काय, भक्त दामाजी, खेकडा चालला दिल्लीला, बापू बिरू वाटेगावकर हे वगनाट्ये लिहिले. त्यांचे एकपात्री प्रयोग असणारे ;विद्रोही तुकाराम हे राज्यभरात प्रचंड गाजले. त्यांच्या निधनाने तमाशा क्षेत्रात दुःखाचे सावट पसरले आहे. 
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.