शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (14:40 IST)

उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका

Uddhav Thackeray
कोरोना संकटात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचे कौतुक कोणीघरच्यांनी केले नसले तरी जगभरातून त्याचे कौतुक झाले. सर्वोच्च न्यायालयाने त्या कामाचे कौतुक केले. कौतुकासाठी नव्हे तर कर्तव्य म्हणून महापालिका आपली कामे करत असताना जरा कुठे खूट झाले की दुषणे देण्यासाठी अनेक जण उभे राहतात. 
 
 नगरसेवक काय करताहेत, महापौर काय करताहेत, आयुक्त काय करताहेत, हे प्रश्न उभे केले जातात. पण त्यांना मला विचारायचेय, तुम्ही स्वतः काय करताय ते आधी सांगा. स्वतः काही करायचे नाही आणि प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारणे सोपे असते आणि प्रश्न विचारायला अकलेची गरज लागत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिकेच्या कामावर सतत टीका करणाऱया विरोधकांना फटकारले.