शनिवार, 20 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (18:16 IST)

विदर्भात विजांच्या कडकडाटासह कोसळणार पाऊस , या भागात गारपिटीची शक्यता

Rain with thunderstorms in Vidarbha
सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र भाग झोडपून काढले आहे. त्यात थंडीचा प्रभाव अधिकच आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस सुरूच आहे. काही भागात गारपिटी मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. थंडीचा कहर वाढतच आहे. मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.  विदर्भात काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंड मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता  आहे. सध्या अवकाळी पावसाने कहर केले आहे . अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी हवाल दिल झाला आहे.