शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (19:45 IST)

माजी सैनिक फेसबुकवर फसले अन्18 लाख गेले

fraud
लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
फसवणूक झालेल्या माजी सैनिकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. फेसबुकवर चॅटिंग करताना फिर्यादी यांची एका महिलेशी ओळख झाली.तीने फिर्यादी यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगितले व त्यांचा विश्‍वास संपादन केला. कंपनीचे उत्पादने विकल्यास तुम्हाला भरपुर कमिशन मिळेल, असे संबंधित महिलेने सांगितले.
पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे फिर्यादी यांनी संबंधित कंपनीच्या बँक खात्यावर वेळोवेळी 13 लाख 10 हजार रूपये पाठविले.
10 ते 20 लाख रूपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. परंतू, 10 ते 20 लाखांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर रक्कम काढता येईल, असे फिर्यादीला सांगितले गेले.
त्यांनी नंतर सात लाख रूपये भरताच कंपनीने बँक खाते बंद केले. ही घटना 8 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी यांची एकुण 18 लाख 39 हजार 702 रूपयांची फसणूक झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहे.