या वेबसाईटने 2021 मध्ये गुगल आणि फेसबुकला मागे टाकून चकित केले
कोरोनाच्या दुसर्या लाटीत वर्ष 2021 मध्ये देखील लोकांचा बराच काळ घरात गेला. या दरम्यान लोकांना टाइम पास आणि मनोरंजनसाठी सोशल मीडिया आणि इंटरनेटची साथ होती. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा जोरदार वापर केला. आता 2021 च्या अखेरीस सोशल मीडिया आणि लोकांच्या इंटरनेट वापराचा जागतिक डेटा थोडा आश्चर्यकारक आहे. वास्तविक, या यादीतील सामग्रीचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या Google ला सर्वोच्च स्थान मिळवता आलेले नाही. कोणत्या वेबसाइटने प्रथम क्रमांकाचा ताज मिळवला आहे आणि टॉप 10 मध्ये कोण आहे हे जाणून घेऊया.
टिकटॉक (TikTok) ने बाजी मारली
वेब इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेबसाइट सिक्योरिटी फर्म क्लाउडफ्लेयर (CloudFlare) द्वारे वर्ष 2021 साठी जाहीर करण्यात आलेल्या डेटाप्रमाणे 2021 मध्ये सर्वात अधिक भेट दिलेल्या वेबसाइटमध्ये टिकटॉक संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर राहिले. टिकटॉकने गूगल आणि फेसबुक सारख्या बड्या कंपनीला पछाडत हे यश मिळवले आहे. हेच नव्हे तर टिकटॉक ऐप यात देखील पुढे राहीलं. वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक डाउनलोड केले गेलेल्या ऐप मध्येही टिकटॉक टॉप वर आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये, टिकटॉक सर्वाधिक भेट दिलेल्या वेबसाइटच्या यादीत 7 व्या क्रमांकावर होते.
यावर्षी टिकटॉकचा चार्ट असा काहीसा आहे
अहवालात असे म्हटले आहे की 17 फेब्रुवारी 2021 रोजी पहिल्यांदाच टिकटॉकने ट्रॅफिकच्या बाबतीत अव्वल स्थान प्राप्त केले होते. हे एक दिवस टिकले. यानंतर मार्च आणि मे महिन्यातही काही दिवस टिकटॉक पहिल्या क्रमांकावर राहिला. 10 ऑगस्ट नंतर कंपनीला गती मिळाली आणि आत्तापर्यंत, टिकटॉक ही बहुतेक वेळा नंबर 1 वेबसाइट आहे. सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बाबतीतही टिकटॉकने चांगली कामगिरी केली आहे. फेसबुकला मागे टाकत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
भारतात बॅन आहे टिकटॉक
टिकटॉक ऐप 2020 पर्यंत भारतात देखील खूप लोकप्रिय होतं आणि याचे यूझर्स करोड होते, पण चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 2020 मध्ये या अॅप आणि वेबसाइटवर बंदी घातली होती. तेव्हापासून हे अॅप आणि वेबसाइट भारतात बंदी आहे.
टॉप 10 मध्ये इतर कंपन्या
टिकटॉक (TikTok)
गूगल (Google)
फेसबुक (Facebook)
मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
अॅप्पल (Apple)
अमेजन (Amazon)
नेटफ्लिक्स (Netflix)
यूट्यूब (Youtube)
ट्विटर (Twitter)
व्हाट्सऐप (WhatsApp)