Year Ender 2021

Notifications

  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. Year ender 2021



खाकीचा अमानुष चेहरा! गरोदर महिलेला पोलिसांची लाथ, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

खाकीचा अमानुष चेहरा! गरोदर महिलेला पोलिसांची लाथ, महिलेचा दुर्दैवी मृत्यूफिरोजाबाद: शिकोहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाभौआ गावात छापा टाकताना पोलीस कर्मचाऱ्यांचे एक लाजिरवाणे कृत्य उघडकीस आले. चोरीच्या एका संशयिताला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांनी कुटुंबीयांना वाईट वागणूक दिली आणि एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथ मारली. यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली आणि प्रसूतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याजवळ पोहोचून आंदोलन सुरू केले. माहिती मिळताच, अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि कारवाईचे आश्वासन देऊन परिस्थिती शांत केली. एसएसपींनी दोन उपनिरीक्षकांसह सहा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले.