मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 एप्रिल 2022 (15:33 IST)

परीक्षा ऑफलाईनच होणार, १ जून ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा घेतल्या जाणार

uday samant
राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. १ जून  ते १५ जुलैदरम्यान विद्यापीठांकडून परीक्षा घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन परीक्षेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतली.

बैठकीनंतर सामंत यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. “कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे, परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.”, असे उदय सामंत यांनी नमूद केले आहे.